Breaking

Thursday, 1 April 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- वाळू चोरांकडून लाच घेणारा उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड निलंबित.


बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- वाळू चोरांकडून लाच घेणारा उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड निलंबित- याबाबत वृत्त असे की
वाळू माफियांकडून गाडी सुरू ठेवण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या माजलगाव येथील लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांना 19 फेब्रुवारी चा रात्री माजलगाव शासकीय निवासस्थानी रंगेहात पकडले, हे प्रकरण सुरू असताना शासनाने महिन्यानंतर निलंबनाची कारवाई केली आहे माजलगाव येथे उपजिल्हाधिकारी असणाऱ्या श्रीकांत गायकवाड याने वाळूची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी तब्बल एक लाख रुपये लाच मागितली होती त्यात 65 हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली होती यामुळे जिल्ह्यात महसूल विभागात चांगलीच खळबळ उडाली होती निलंबनाची कारवाई केल्यामुळे लाचखोर अधिकाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment