Breaking

Saturday, 17 April 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमिर आतार- पंढरपूर विधानसभेसाठी 68% मतदान.


पंढरपूर - येथील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार ६८ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. मतदान शांततेत पार पडले. या प्रक्रियेत निवडणूक आयोग आणि आरोग्य विभागाने कोरोना विषयक दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन झाले.
महाविकास आघाडीकडून भगीरथ भारत भालके आणि भाजप आघडीकडून समाधान आवताडे यांच्यात सरळ लढत असल्याचे शेवटच्या टप्यात स्पष्ट झाले. बंडखोर उमेदवार किती मते घेतात, आदल्या रात्रीचा प्रचार, 'अर्थपूर्ण' प्रचार या तीन बाबींवर विजयाचे गणित ठरणार आहे. मतमोजणी २ मे रोजी होणार आहे.

No comments:

Post a Comment