Breaking

Monday, 22 March 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- वळसंग क्लोरल हायड्रेट विषारी द्रव्याचा समावेश, नागरिकांचे आरोग्य धोक्यात.


*वळसंग : ‘क्लोरल हायड्रेट’ विषारी द्रव्याचा समावेश, नागरिकांचे आरोग्य धोक्यात*


*सोलापूर  (प्रतिनिधी)* – 
‘क्लोरल हायड्रेट’ हे विषारी द्रव्य मिसळून तयार करण्यात येणार्‍या रासायनिक ताडीचे घरगुती विक्रीचे प्रमाण नवीन विडी घरकुल कुंभारीमध्ये वाढलेले आहे.
 ही ताडी आरोग्याला अपायकारक असून पिणार्‍या शौकिनांची गर्दी वाढतच आहे. 
नवीन विडी घरकुल कुंभारी परिसरात अशी घरगुती केंद्रे फोफावत आहेत.
तरुण पिढी ताडीच्या व्यसनात अडकत असून अशा अनधिकृत ताडी विक्रीवर पायबंद घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस प्रशासनाचे (सोलापुर ग्रामिण)
 दुर्लक्ष होत आहे. 
सोलापूर ग्रामीणमध्ये गोदुताई नवीन घरकुल आदी भागात रासायनिक ताडी विकत आहेत.
या ठिकाणी २० रुपये प्रती लिटर ताडी विक्री होत आहे. 
एका ताडी दुकानात दररोज सुमारे बाराशे ते पंधराशे लिटर ताडी विक्री होते.
 यावरून ताडी पिणार्‍यांची संख्या किती हे लक्षात येते. 
नवीन विडी घरकुल कुंभारी ग्रामीण भागात अलीकडे अशी घरगुती ताडी विक्री वाढलेली आहे.

No comments:

Post a Comment