पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- टेंभूर्णी येथील उपजिल्हा रुग्णालयाला अखेर मंजुरी...सामाजिक कार्यकर्ते बशीर जहागिरदार यांच्या प्रयत्नांना यश-
टेंभुर्णी येथील उपजिल्हा रुग्णालयाला अखेर मंजुरी सामाजिक कार्यकर्ते बशीर जहागीरदार यांच्या प्रयत्नांना अखेर यश
सोलापूर जिल्ह्यातील पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या टेंभुर्णी या महत्त्वाच्या गावी शासनाने उपजिल्हा रुग्णालयाला अखेर मंजुरी दिली आहे याबाबत टेंभुर्णी येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते बशीर जहागीरदार यांनी टेम्भूर्णी मध्ये उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी अनेक आंदोलने मोर्चे उपोषणे केली अखेर शासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेत टेंभुर्णी येथे उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी दिली आहे
टेंभुर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते बशीर जहागीरदार यांनी टेंभुर्णी येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर व्हावे यासाठी अनेक आंदोलने केली यामध्ये 2017 या वर्षांमध्ये सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन तर याच वर्षी मुंबई येथील आझाद मैदान येथे तीन दिवसाचे लाक्षणिक उपोषण तर 2018 या वर्षात नागपूर येथील मिनी मंत्रालयासमोर सात दिवसाचे आमरण उपोषण केले तर 2019 रोजी टेंभुर्णी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन केले याशिवाय आपल्या आंदोलनाला यश मिळत नाही हे पाहता अखेर जहागीरदार यांनी ऑक्टोंबर 2020 या वर्षात टेंभुर्णी ते मंत्रालय असा पदयात्रा काढण्याचा ठाम निर्णय घेऊन तशा पद्धतीचे निवेदन राज्य शासनाच्या आरोग्य खात्याकडे दिले होते मात्र अखेर राज्य शासनाने जहागीरदार यांच्या मागणीची गंभीर दखल घेत टेंभुर्णी येथील उपजिल्हा रुग्णालयाला अखेर मंजुरी दिली आहे सदरचे उपजिल्हा रुग्णालय हे 50 खाटाचे असून पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर सदरचे उपजिल्हा रुग्णालय आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार असल्याचे श्री जहागीरदार यांनी शेवटी बोलताना सांगितले,
*उपजिल्हा रुग्णालयाचे फायदे*
********************************
1) सर्व औषधउपचार मोफत
2) सदरचे रुग्णालय महाराष्ट्र आरोग्य विभाग अंतर्गत असणार आहे.
3) 4 ते 5 डॉक्टर असतील
4) सर्व अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध होणार
5) लहान मुलांसाठी,दातांचे उपचारासाठी,महिलांसाठी व जनरल पेशंटसाठी वेगवेगळे स्पैशल डॉक्टर असणार.
6) महिलांचे सिस्रिंग चे ऑपरेशन तिथे होणार आहे
7) दोन अंबूलन्स असणार आहे
8) 15 ते 20 नर्स व कर्मचारी असणार आहे
9) पेशंट व त्या बरोबर असणारे व्यक्तीला मोफत जेवन मिळणार.


No comments:
Post a Comment