Breaking

Saturday, 6 March 2021

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- पंढरपूरात अवैद्य सावकारी प्रकरणी शहर पोलीस आणी सह.निबंधक कार्यालयाची संयुक्त कारवाई.


पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- पंढरपूरात अवैद्य सावकारी प्रकरणी शहर पोलीस आणी सह.निबंधक कार्यालयाची संयुक्त कारवाई- याबाबत वृत्त असे की भारतीय जनता पार्टी चे युवा मोर्चा चे शहराध्यक्ष विदुल अधटराव यांच्या विरोधात कर्जदाराकडून दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेत पंढरपूर शहर पोलीस ठाणे आणी सह.निबंधक सहकारी संस्था पंढरपूर यांच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई केली असून या कारवाईत स्टॅम्प, 48 चेक तसेच मोठ्या प्रमाणात सावकारी येण्या-देण्याचा हिशोब असलेले कागदपत्रे, प्रदीप भानुदास सावंत ( सहकार अधिकारी श्रेणी 1) यांच्या उपस्थितीत ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 
पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या कडून नागरिकांना आवाहन करण्यात आले असून आपल्या परिसरातील कर्जदारांची जमीन, जागा, वाहने, अवैधरित्या गहाण ठेवून अवाजवी व्याज, दंड आकारणी करणार्या व यासाठी छळ करणार्या अवैद्य खाजगी सावकारी करणार्या इसमांविरोधात पोलिसांकडे तक्रार द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment