Breaking

Saturday, 6 March 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- मोडनिंब जवळ सर्व्हिस रोड वरती दोन दुचाकीच्या भीषण अपघातात एक गंभीर जखमी, तर एक किरकोळ जखमी.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- मोडनिंब जवळ सर्व्हिस रोड वरती दोन दुचाकीच्या भीषण अपघातात एक गंभीर जखमी व एक किरकोळ जखमी- याबाबत वृत्त असे की आज दिनांक ०६-०३-२०२१ रोजी मोडनिंब गावाजवळ सर्व्हिस रोड येथे  दोन दुचाकीच्या भीषण अपघातात एक जण गंभीर जखमी आणि एक किरकोळ जखमी झाला आहे , सदर अपघात दोन दुचाकी सामोरा समोर धडकून झाला आहे. या अपघातातील जखमींना वरवडे टोल प्लाझा रुग्णवाहिके मध्ये तात्काळ उपचारासाठी सोलापूर येथील  खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असुन जखमींवर उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी मा.सज्जन वाघमोडे साहेब आणि महामार्ग पोलिस कर्मचारी वरवडे टोल प्लाझा ग्रस्थी पथकाने (NHAI पेट्रोलिंग टीम) अपघात झालेल्या ठिकाणी तात्काळ पोहचून  जखमी झालेल्याना मदत केली आहे.

No comments:

Post a Comment