कोरोनामुळे अर्थसंकल्प ढासळला,
करवाढ नसलेला महानगरपालिकेचा १५०९ कोटींचा अर्थसंकल्प ;
१२५ कोटींची कपात.......
मीरा-भाईंदर महापालिकेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षांचा प्रशासकीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
गेल्या वर्षी १६३४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता.
मात्र, यंदा कोरोना संकटामुळे महापालिकेच्या जमा-खर्चाचे गणित बिघडले असून या तुटीमुळे यंदाचा अर्थसंकल्प १५०९ कोटींचा तयार करण्यात आला आहे.
जवळपास सव्वाशे कोटींची कपात अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, तर यंदा महत्त्वाच्या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला असून अंदाजपत्रातील तरतुदीवर चर्चा केल्यानंतर त्याला अंतिम मंजुरी देण्यात येणार आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेचा सन २०२०-२१ चा सुधारित १२६५ कोटी ८६ लाख ५० हजार आणि सन २०२१-२२ चा मूळ १५०९ कोटी १७ लाख ३५ हजार रुपयांचे अंदाजपत्रक आहे.
कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक घडी मोडल्याने कोणत्याही स्वरूपाची करवाढ यंदा करण्यात आलेली नाही.
तसेच टाळेबंदीमुळे मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे मुख्य आर्थिक स्रोत थंडावल्यामुळे पालिकेचे उत्पन्न वाढवण्याकरिता अधिकाधिक भर देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली आहे.
शिक्षण विभाग पालिकेच्या एकूण ३६ शाळा शहरात उपलब्ध आहेत.
या शाळेतील विद्यार्थी पटसंख्या कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे शिक्षण विभागात अत्याधुनिक बदल करण्याकरिता २४.४६ कोटी खर्चाची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
खर्चाच्या ठळक बाजू सार्वजनिक बांधकामांवर भर शहरात वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांना विविध स्वरूपांची सुविधा पुरवण्यावर अधिक भर देण्यात आला आहे.


No comments:
Post a Comment