Breaking

Sunday, 28 March 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमिर आतार- कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने उपोषण.


मोदी सरकारने संविधान आणि लोकशाहीला पायदळी तुडवत बहुमताच्या जोरावर लादलेले कृषी कायदे व अन्यायकारक इंधन दरवाढी विरोधात प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोलेजी यांच्या अध्यक्षेतेखाली राज्यव्यापी उपोषण सुरु आहे. याच पार्श्वभुमीवर आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेसतर्फेही उपोषण करण्यात आले. 

यावेळी, यावेळी, पक्ष निरीक्षक मा.आ. शिरीष चौधरीजी, आमदार प्रा. जयंत आसगवकर, गुलाबराव घोरपडे, काँगेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, ऍड. सुरेश कुऱ्हाडे, दिलीप पाटील, माजी नगरसेवक मोहन सालपे, तौफिक मुल्लाणी, सचिन चव्हाण, संजय मोहिते, बाळासाहेब सरनाईक, संध्या घोटणे,  सुलोचना नायकवडे, चंदा बेलेकर, करवीर पंचायत समिती सभापती मीनाक्षी पाटील, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, अर्जुन माने, सचिव संजय वाईकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. अशी माहिती  ना. सतेज (बंटी) डी. पाटील अध्यक्ष,
कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी VBP NEWS सोबत बोलताना दिली आहे. 

No comments:

Post a Comment