Breaking

Tuesday, 2 March 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- पूजा चव्हाण प्रकरणा संदर्भातील प्रश्न ऐकून पोलिस आयुक्त हसत हसत पत्रकार परिषद सोडून निघून गेले.


 पूजा चव्हाण प्रकरणासंदर्भातील प्रश्न ऐकून पोलीस आयुक्त हसत हसत पत्रकार परिषद सोडून निघून गेले......
 
राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी मागील काही दिवसांपासून असणाऱ्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी  राजीनामा दिला. 
याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात  पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला.
 मात्र प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी गुप्ता आपल्या खुर्चीवरुन उठून हॉलबाहेर गेले.
 पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी पूजा चव्हाण प्रकरणी संशयित मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे का?, 
पोस्ट मार्टम अहवाल नेमका काय आले आहे, 
यासारखे प्रश्न विचारण्यात आले. 
मात्र या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी गुप्ता हे हसतच आपल्या जागेवरुन उठले आणि हॉलबाहेर पडले. 
पूजा चव्हाण तपासासंदर्भातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता पुण्याचे पोलीस आयुक्त पत्रकार परिषद सोडून निघून गेले.
 पत्रकार त्यांना काहीतरी माहिती द्या अशी विनंती करत असताना त्याकडे साफ दुर्लक्ष करत गुप्ता यांनी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेल्या हॉलमधून काढता पाय घेतला.

No comments:

Post a Comment