Breaking

Tuesday, 2 March 2021

सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते- कोरोना साहित्य खरेदीत 35 कोटींचा घोटाळा झाल्याचा भाजपा चा आरोप.


 कोरोना साहित्य खरेदीत ३५ कोटींचा घोटाळा झाल्याचा भा.ज.पा.चा आरोप......
 
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना साहित्याची ८८ कोटींची खरेदी करण्यात आली.
 चढ्या दराने सर्वच साहित्य खरेदी करण्यात आली. 
या खरेदीत ३५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप  भा.ज.पा.ने पत्रकार परिषदेत केला.
 या गैरव्यवहारावर लेखापरीक्षनात गंभीर ताशेरे ओढले आहेत. 
राजकीय वरदहस्ताने हा घोटाळा झाला आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. 
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना साहित्यातील घोटाळा प्रकरण सातत्याने गाजत आहे. 
भा.ज.पा.चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही या घोटाळ्याची चौकशी होण्याची मागणी केली आहे. 
भा.ज.प.चे जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी  पत्रकार परिषद घेऊन कोरोना साहित्यातील घोटाळ्यासंदर्भातील सविस्तर तपशील प्रसार माध्यमांसमोर मांडला केला. 
यावेळी किसान सभेचे अध्यक्ष भगवान काटेही उपस्थित होते. 
निंबाळकर म्हणाले, ८८ कोटी रुपयांची खरेदी करण्यात येऊन त्याची बिले अदा करण्यात आली आहेत. 
 ४५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. मात्र ही सर्व खरेदी शासनाचे नियम डावलून मनमानी पद्धतीने करण्यात आली आहे. 
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, शल्यचिकित्सक यांच्या समितीने ही खरेदी केली आहे.
 समितीचे सहअध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व कंत्राटी आरोग्य अधिकारी नितीन लोहार यांच्या स्वाक्षरीने बिले देण्यात आली आहेत. 
अनेक पात्र कंपन्यांना डावलून राजकीय हितसंबंध असणाऱ्या लोकांच्या कंपन्यांकडून खरेदी केली असल्याचे आरोप भा.ज.पा.ने केले आहेत. 
थर्मल स्कॅनरची किंमत अकराशे रुपये असताना ते दहा हजार रुपयांना खरेदी करण्यात आले. मास्क सुरुवातीला दोनशे पाच रुपयांनी खरेदी केले नंतर ते केवळ १४ रुपयाला खरेदी केली.

No comments:

Post a Comment