Breaking

Tuesday, 2 March 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- मोबाईल साठी तरूणीवर जिवघेणा हल्ला.


मोबाइलसाठी तरुणीवर जीवघेणा हल्ला; 
कॉटन ग्रीन-शिवडी स्थानकादरम्यान धक्कादायक घटना.........
 
मुंबई लोकलने प्रवास करताना मोबाइल चोरी होण्याच्या अनेक घटना समोर येत असतात. 
यासाठी बऱ्याचदा लोकलच्या दरवाजावर उभ्या असलेल्या प्रवाशांना टार्गेट केलं जातं. 
अशीच एक घटना समोर आली आहे 
ज्यामध्ये मोबाइल चोरांमुळे तरुणीला आपला जीव गमावावा लागला असता. 
कॉटन ग्रीन आणि शिवडी स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. 
सुदैवाने तरुणीला गंभीर इजा झालेली नाही.
 पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली आहे. 

नेमकं काय झालं ......

परळची रहिवासी असणारी प्रगती सरफरे  संध्याकाळी कामावरुन परतत होती. 
संध्याकाळी ७ ते ७:१५ दरम्यान तिने पनवेल ट्रेन पकडली. 
शिवडी स्थानकाला उतरणार असल्याने कॉटन ग्रीन स्थानकानंतर ती दरवाजात येऊन उभी राहिली. 
लोकल ट्रेन कॉटन ग्रीन आणि शिवडीच्या मधे असतानाच अचानक तिच्या हातावर जोरात फटका बसला आणि हातातला मोबाइल खाली पडला.
 प्रगतीला काही वेळासाठी काय झालं हे कळलंच नाही. 
प्रगती शिवडी स्थानकावर उतरली तेव्हा आरडाओरडा सुरु झाला होता कारण लोकलमधील अजून एका मुलाचाही मोबाइल चोरीला गेला होता. 
यानंतर स्थानकावर उपस्थित आर.पी.एफ. जवानांनी लगेचच घटना घडली त्या दिशेने धाव घेतली पण तोपर्यंत चोर तेथून पळून गेले होते. 
प्रगतीचा पती सुशांतने लोकसत्ता  दिलेल्या माहितीनुसार, “प्रगती आणि मी तक्रार करण्यासाठी पोहोचलो असता वडाळा स्टेशनला जाण्यास सांगण्यात आलं. 
घरात कोणी नसल्याने आम्ही आमच्या पाच वर्षाच्या मुलाला घेऊन वडाळा स्टेशनला पोहोचलो.
 अखेर दोन तासांनी आमची तक्रार नोंदवण्यात आली”.

No comments:

Post a Comment