माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे-ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात भेंडला प्रथम पुरस्कार- याबाबत वृत्त असे की आर.आर.आबा सुंदर गाव योजनेंतर्गत माढा तालुक्यातील भेंड गाव महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे.
भेंड येथे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून आणी विविध शासकीय योजनेतून अभिनव उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, महिला सक्षमीकरण, वनराईमध्ये बियारोपण उपक्रम, प्रत्येक रविवारी सामुदायिक श्रमदान मोहीम, स्वच्छता उपक्रम, जनजागृती कार्यक्रम असे विविध उपक्रम भेंडमध्ये अविरतपणे राबविले जात आहेत.
भेंडच्या जिल्हा परिषद शाळेची भेंड गाव आर.आर.आबा सुंदर गाव स्पर्धेत सहभागी झाले, त्यानंतर गावात विविध निकषांची तयारी करण्यासाठी सरपंच डाॅ. संतोष दळवी,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, ग्रामसेवक प्रविण झाकर्डे, ग्राम परिवर्तक आनंद पुजारी यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले, सन 2019-2020 या आर्थिक वर्षात व्हिएसटीएफ, निधीमधून भेंड गावात शौचालय दुरूस्ती, बाकडी बसविणे, अंगणवाडी गेट बसविणे, शालेय संरक्षण भिंत बांधणे, वृक्ष संवर्धन साठी ड्रीप सिस्टीम बसविणे, ध्वजस्तंभ व स्टेज बांधकाम करणे, कचराकुंडी वाटप करणे, अशी लोकोपयोगी कामे करण्यात आली आहेत.
🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎉🎊 *सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचे पारितोषक वितरण समारंभ होणार आहे.*
🏆🏆🏆 *या पारितोषक वितरण सोहळ्यामध्ये भेंड गावचा समावेश असुन मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, सिनेअभिनेता अमीर खान, सत्यजीत भटकळ, किरण राव व इतर मंत्री महोदय उपस्थीत असणार आहेत. महाराष्ट्र तील समृध्द गाव स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या व सन्मानास पात्र झालेल्या गावाबरोबर संवाद साधणार आहेत. भेंड गावची निवड झाली आहे.तरी सर्व ग्रामस्थांनी दि.22/03/2021 वार सोमवार दुपारी 12.30 वाजता ABP माझा या न्यूज चॅनल वर होणार आहे, होणारा सन्मान सोहळा कार्यक्रम पाहण्यात यावा.*🌸🌸🌸
*हा सन्मान समारंभ ABP माझा, You Tube, Facebook Live वरती प्रदर्शित होईल.*


No comments:
Post a Comment