Breaking

Saturday, 20 March 2021

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी/ सचिन खंदारे- महाराष्ट्रात नवे गृहमंत्री?


महाराष्ट्रात नवे गृहमंत्री ?
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून ‘प्रशस्तीपत्रक’ मिळाल्यानंतर, चार दिवसांतच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  दिल्लीत येऊन पवारांशी दोन तास चर्चा केली.
 या भेटीमुळे राज्याच्या गृहखात्याच्या मंत्रिपदाच्या संभाव्य बदलाबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. 
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या चौकशीप्रकरणी राज्याच्या गृहखात्याने योग्य कारवाई केल्याचे सांगत पवार यांनी अनिल देशमुख यांची पाठराखण केली होती. 
त्यानंतरही देशमुखांना पवार यांची दिल्लीत येऊन भेट घ्यावी लागली आहे.
 मिहान प्रकल्पातील उद्योगांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आपण शरद पवार यांची भेट घेतल्याचे सांगत देशमुख यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना बगल दिली. 
पण या भेटीमुळे पवारांनी देशमुखांच्या गृहखात्याच्या कारभाराचा ‘आढावा’ घेतल्याचे सांगितले जाते. 
स्फोटकांचे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एन.आय.ए.) देण्यात आले असून तपासात राज्य सरकार पूर्ण सहकार्य करत आहे. 
‘एन.आय.ए.’चा अहवाल आल्यानंतरच या प्रकरणावर अधिक भाष्य करणे उचित राहील, असे देशमुख म्हणाले. 
परमवीर यांच्याकडून काही चुका झाल्या असल्यामुळे त्यांची बदली करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले होते. 
निलंबित साहाय्यक निरीक्षक सुनील वाझे यांच्या अटकेनंतर, त्यांच्या राज्य सरकारमधील ‘सूत्रधारां’ची चौकशी करण्याची मागणी करत भा.ज.पा.ने महाविकास आघाडीवरील दबाव वाढवला आहे. 
या पार्श्वभूमीवर देशमुखांकडून गृहमंत्रिपदाची जबाबदारी अन्य वरिष्ठ नेत्यांकडे देण्याची चर्चा तीव्र झाली आहे. 
मात्र राज्य मंत्रिमंडळात तात्काळ बदलाची शक्यता दिल्ली दौऱ्यावरील ज्येष्ठ मंत्र्याने फेटाळली.

No comments:

Post a Comment