खोका उत्पादन अडचणीत......
पुठ्ठा खोके (कोरुगेटेड बॉक्स) तयार करण्यासाठीच्या कागदाच्या लगद्याची चीनला मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याचा फटका देशातील पुठ्ठा खोक्याच्या उत्पादनाला बसला आहे.
खोका तयार करण्यासाठीच्या कागदाचे दर गेल्या चार महिन्यांत जवळपास ७० टक्क्यांनी वाढले आहेत, त्यात दररोजच वाढ होत आहे.
कागदाच्या तुटवड्यामुळे खोक्यांच्या उत्पादनावरच परिणाम होऊन देशातील उद्योग क्षेत्राची मागणी पूर्ण होत नाही.
त्यामुळे चीनला होणारी कागदाच्या लगद्याची निर्यात थांबवण्याची मागणी व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.
गेल्या चार महिन्यांमध्ये पुठ्ठा तयार करण्यासाठीच्या कागदाच्या दरात ७० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने हा उद्योग अडचणीत आला आहे.
चीनला कागदाच्या लगद्याची होणारी निर्यात हे त्यामागील मोठे कारण असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
चीनकडून हार्डवेस्टऐवजी केवळ लगदा घेतला जातो.
या लगद्यावर प्रक्रिया करून पुठ्ठा खोक्याचा कागद तयार केला जातो.
कोरोनाच्या काळात पुठ्ठा खोके उत्पादकांनी धोका पत्करून काम केले.
आरोग्य क्षेत्रासह विविध उद्योग क्षेत्रांना पुठ्ठा खोका पुरवण्यात आला.
मात्र गेल्या चार महिन्यांमध्ये कागदाच्या किमतीमध्ये दररोज वाढ होत आहे.
तसेच प्रचंड मागणी असताना कागदाच्या तुटवड्यामुळे आवश्यक तितके उत्पादनही करता येत नाही.
त्याशिवाय डिझेलच्या दरवाढीमुळे एकूण उत्पादन खर्च वाढला आहे.
मात्र ग्राहकांकडून वाढीव दरानुसार खरेदी केली जात नाही.
पुठ्ठा खोके खरेदी करणारे मोठे उद्योग असल्याने त्यांचा या उत्पादन क्षेत्रावर दबाव आहे.
त्यामुळे पुठ्ठा खोके उत्पादकाला त्याचा मोठा फटका बसत आहे, असे गांधी यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment