मोडनिंब (प्रतिनिधी) : मोडनिंब, ता. माढा, येथील संजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शेती विषयक योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून क्रॉप सायन्स या विषयासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यावर राज्य शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी संजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी नव्याने मान्यता दिलेली आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतीविषयक आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.
व परिसरातील बाहेरगावी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तसेच त्यासाठी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागत होते हा प्रकार थांबविण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष तथा समाज कल्याण चे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी मोडनिंब मध्ये या अभ्यासक्रमासाठी परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न केले. क्रॉप सायन्स या विषयाचा मान्यता मिळाल्याने संस्थेचे व शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यासाठी संस्थेचे सचिव प्रकाश इंगळे व सर्व सदस्य तसेच सर्व पालकांचे सहकार्य लाभले. प्राचार्य दीपक कुंभार मुख्याध्यापक अमोल सरडे व प्रशालेतील सर्व शिक्षकांनी काम पाहिले.
--------------------------------------
*ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी व बारावीनंतर पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुलभ व्हावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करून सारख्या ग्रामीण भागात संजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये आम्ही क्रॉप सायन्स विषयास मान्यता मिळविली आहे ग्रामीण परिसरातील शहरी भागातील ही विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.*
- *शिवाजी कांबळे*
अध्यक्ष, संजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मोडनिंब.
तथा मा. सभापती, समाजकल्याण विभाग, जि.प. सोलापूर.
--------------------------------------


No comments:
Post a Comment