*रस्ते आपघात योजनेला स्वर्गीय बाळासाहेबांचे नाव देऊन राज्य सरकार जनतेची दिशा भुल करत आहे.* वंचित बहुजन आघाडीचे मोहोळ तालुका युवा अध्यक्ष महादेव आप्पा गाडे यांचा आरोप....
*16 सप्टेंबर 2020 ला राज्य मंत्री मंडळात निर्णय घेण्यात आला की जर रस्त्यावर आपघात झाला आसेल तर केवळ पैशा अभावी कोणाचा जिव जाऊ नये म्हणून सुरूवातीच्या 72 तासा मधे जखमी व्यक्ति हा कुठल्याही राज्यातील असो व त्याचा आपघात कुठल्याही रस्त्यावर झालेला असो त्याला कुठल्याही खाजगी हाॅस्पीटलमध्ये भर्ती केले आसता 30 हजार रुपये पर्यंतचा प्राथमिक खर्च महाराष्ट्र राज्य करेल.*
*दि.16 मार्च 2021 रोजी म्हणजे रस्ते आपघात योजनेची राज्य सरकार ने घोषणा केल्या नंतर तब्बल 6 महिण्यांनी देऊळगाव मही जि.बुलढाणा येथील इम्रान सय्यद यांचा मला फोन आला व त्यांनी मला कळवले की रस्ता आपघातात ड्राइवर गंभीर जखमी आहे.त्याला चिखली येथे तात्पुरते उपचार करूण औरंगाबाद येथील सिग्मा हाॅस्पीटलला आणलेले आहे.त्यांचे कडे सध्या 20,000 हजार रुपये आहेत. परंतु 50,000 रूपये डिपॉजिट केल्या शिवाय पुढिल उपचारास सुरूवात केली जाणार नाहि आसे तेथील डाॅक्टर म्हणाले .असे मला इम्रान सय्यद यांनी कळवले.मी पेशंट सोबतच्या व्यक्तिचा मोबाइल नंबर घेतला व सिम्गा हाॅस्पीटलच्या कर्मचार्याशी बोलण्याचे प्रयत्न केले आसता तेथील कर्मचार्याने माझ्याशी बोलण्यास स्पष्ट शब्दात इन्कार केला.*
*मी फोन करुण जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे मराठवाड़ा रुग्ण वाहिका अध्य्क्ष श्री जावेदभाई यांना मि फोन करुण सदरील घटणेची माहिती दिली.श्री जावेदभाई यांच्या प्रयत्ना मुळे 20 हझार रुपये डिपॉजिट घेतल्या गेले त्या नंतरच रुग्णावर उपचारास सुरवात केले गेले जय संघर्ष यांच्या प्रयत्ना मुळे 20 हजार रुपये डिपाँजिट घेतल्या गेले त्या नंतरच रूग्णावर उपचारास सुरूवात केली गेली.*
*राज्य सरकारच्या 30 हजाराच्या घोषणेचे तर सोडाच परंतु जवळचे 20 हजार रुपये घेऊन पण खाजगी हाॅस्पीटलला उपचारास सुरूवात केली जात नसेल तर आशा फसव्या रस्ते आपघात योजनेला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊन सामान्य जनतेची राज्य सरकारने दिशाभुल करू नये.*
*गोरगरीब जनता लाँक डाउन मुळे उपास मारीने मरते आहे.तर कोणी कर्ज बाजारी झाल्यामुळे आत्महत्या करूण मरते आहे.परंतु महाराष्ट्र राज्यातील सत्तेतील सत्ताधारी पक्ष व प्रमुख विरोधी पक्ष हत्या की आत्महत्या हे सिद्ध करण्यात व्यस्त आहेत.* असा आरोप
*वंचित बहुजन आघाडी*
*मोहोळ तालुका युवा अध्यक्ष*
*महादेव आप्पा गाडे* यांनी राज्य सरकारवर केला आहे.


No comments:
Post a Comment