निगडी तर्फे सातारा गावातील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन प्रसंगी शशिकांत शिंदे उपस्थित होते. यामध्ये निगडी-चिंचणेर जोडरस्त्यावरील कण्हेर कालव्यावर पूल, व्यायाम शाळा , गावातील अंतर्गत रस्ते, मातंग वस्ती ते गावठाण बंदिस्त गटारे, जि. प. शाळा मैदान सपाटीकरण ही कामे आहेत. यावेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
निगडी-चिंचणेर जोडरस्त्यावरील पुलाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होता कारण त्या भागातील ३-४ गावांना जोडणारा तो पूल होता. त्या भागातील लोकांना हा पूल नसल्याने फिरून जावे लागत होते. अत्यंत महत्वाचा असणारा हा प्रश्न मार्गी लागल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. गावातील अंतर्गत रस्ता होत नसल्याने गावातील ग्रामस्थांनी शशिकांत शिंदे यांच्याशी संपर्क केला होता त्यावर निधी मंजूर करून त्यांनी रस्ता करून दिला. गावातील इतर विकास कामांना भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याचे समाधान आहे असे VBP NEWS सोबत बोलताना शशिकांत शिंदे यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment