Breaking

Saturday, 20 March 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- लाल परितून तब्बल 81 जणांचा प्रवास, या डेपोला ठोठावला एक लाखाचा दंड.


*‘लालपरी’तून तब्बल ८१ जणांचा प्रवास; ‘या’ डेपोला ठोठावला एक लाखाचा दंड*

लातूर – देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 
देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र राज्यात आढळत असून मागील २४ तासांत २५ हजारहून अधिक रुग्ण सापडले आहे. 
त्यामुळे कोरोना नियम कडक करण्यात आले आहेत. 
याची अंमलबजावणी कडक होत आहे.
 नियम कडक असताना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याचे समोर आले आहे. 
त्यामुळे परभणी डेपोला तब्बल १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
लातूर-जिंतुर ही M.H. 20 B.L. 1922 क्रमांकाची बस जिंतुरकडे येत असताना या बसची तपासणी करण्यात आली.
 जिंतुरचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार सखाराम मांडवगडे आणि जिंतुर नगरपरिषदचे अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने तपासणी केली.
यावेळी बसची आसन व्यवस्था ही ५५ जागांची असताना तब्बल ८१ प्रवासी बसवलेले होते.
 महत्त्वाचे म्हणजे एक कुत्र्याचे पिल्लूही बसमध्ये प्रवास करत होते. 
त्यातच प्रवाशांच्या तोंडाला ना मास्क होते, ना सॅनिटायझर, ना सोशल डिस्टनसिंग.
या निष्काळजीपणासाठी जिंतूर आगार व्यवस्थापकांना तब्बल १ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
 महत्त्वाचे म्हणजे २२ मार्चपर्यंत हा दंड न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी काढले आहेत.
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी २० फेब्रुवारी रोजी काढलेल्या आदेशात म्हटलं होतं की, वाहन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाता येणार नाही. 
तरी देखील बसमध्ये ८१ प्रवासी होती. 
त्यामुळे १ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. अशाप्रकारे एवढा मोठा दंड ठोठावण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 त्यामुळे आता एस.टी. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment