🌹आज दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिन साजरा केला जातो.
🙏 जिजाऊ माँसाहेब ज्यांनी छत्रपतींना घडवलं, संभाजी राजांना घडवलं, त्याच बरोबर स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहील व ते राजांना सत्यात उतरवायला लावलं, स्वराज्यातील रयतेला यौवनांच्या गुलामगिरीतून मुक्त केलं, अशा राजमातेला मानाचा मुजरा त्याचबरोबर अनेक संकटाला सामोरे जाऊन स्त्री शिक्षणाचा पाया रचून जगाची सर्व कवाडे स्त्री जातीला मुक्त करून देणारी पहिली जगातील पहिली महिला शिक्षिका "सावित्रीबाई फुले"माता रमाई"देशावर अकरा वर्ष पंतप्रधान म्हणून काम पाहिलेल्या श्रीमती इंदिरा गांधी/एव्हरेस्ट शिखर सर करणारी बचेंन्द्रीपाल तर अवकाश यानात भरारी घेणारी कल्पना चावला व बाँक्शिंगमध्ये नैपुण्यपूर्ण कामगिरी करणारी "मेरी कोम"अशा आतंरराष्ट्रीय पातळीवर भारतदेशाचे नांव
दीपस्तंभासारखे "अजरामर करणा-या या अव्दितीय मातांना जागतिक महिला दिनानिमित्त मानाचा मुजरा👏🌹💐🌺🍁🌻🌈जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
दर वर्षी 8 मार्चला जगभर आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. केवळ स्त्री म्हणून वाट्याला येणाऱ्या मानवी हक्कांच्या पायमल्लीविरुद्घ रस्त्यावर उतरून केलेल्या संघर्षाची आठवण करून देणारा हा उत्सव आहे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात आज स्त्रीने पुरुषाच्या बरोबरीनी आपल्या श्रेष्ठतेचा झेंडा फडकवला आहे. महाराष्ट्राला झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले अशा कर्तृत्ववान आणि लढाऊ बाण्याच्या स्त्रियांची परंपरा लाभली आहे.
महिला या शब्दाबरोबर प्रेम, वासल्य, स्नेह, ममता या भावना समोर येतात. पण त्याचबरोबर शक्तीसंपन्न स्त्रीही समोर उभी रहाते. कारण आता स्त्रीही अबला राहिलेली नाही. ती सबलाही झालेली आहे. ही एक गौरवाची बाब आहे........ #जागतिकमहिलादिन #HappyWomensDay #Wishes
VBP NEWS संपादक
- विजयकुमार परबत 9657198727.


No comments:
Post a Comment