बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- गढी येथील नवोदय विद्यालयात 12 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह - या बाबत सविस्तर वृत्त असे की गेवराई तालुक्यातील गढी येथे असलेल्या नवोदय विद्यालयात 12 विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने तातडीने उपायोजना सुरू केले आहेत नवोदय निवासी विद्यालयात जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी तातडीने भेट दिली यावेळी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी करून संबंधित यंत्रणांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले नवोदय विद्यालयात 102 विद्यार्थी निवासी पद्धतीने शिक्षण घेत असून त्यासह 27 कर्मचारीदेखील आहेत येथे असणाऱ्या विद्यार्थ्यांसह अध्यापक कुटुंबीय आणि कर्मचारी यांना देखील कोरोना ची लागण झाल्याचे दिसून आले, त्यामध्ये प्राचार्य आणि अध्यापक या दोघांसह कुटुंबातील दोन सदस्य एक आचारी व एक मेस कर्मचारीदेखील कोरोना बाधित झाल्याचे दिसून आले.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment