Breaking

Sunday, 7 February 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- नवीन कृषी कायद्या बाबत VBP NEWS चे बीड जिल्हा प्रतिनिधी सुदाम शिंगाडे यांचे मत.


बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- नवीन कृषी कायद्याबाबत VBP NEWS चे बीड जिल्हा प्रतिनिधी सुदाम शिंगाडे यांचे मत-
थोडक्यात काय तर 113 कोटींची वांगी कोणाला विकली आणि त्याने पुढे ती कोणाला कितीला विकली हे सांगावे लागू नये म्हणून कायदा रद्द करण्यासाठी जीवाचे रान चालू आहे.

कायदा वाचा खाली

"नव्या कृषिकायद्यातील कोणकोणती कलमं तुम्हाला योग्य वाटत नाहीत ते सांगा,आपण त्यावर पुनर्विचार करू" असं आश्वासन कृषिमंत्र्यांनी पुन्हा पुन्हा देऊन सुद्धा शेतकरी नेते हे कायदे रद्द झालेच पाहिजेत या एकाच मुद्द्यावर का ठामपणे अडून राहिले आहेत?

या प्रश्नाचे एक आणि केवळ एकच उत्तर आहे.ते म्हणजे या कायद्यांखाली शेतकरी त्याने उत्पादन केलेला शेतमाल विकून जे  उत्पन्न मिळवील  ते  पूर्वीप्रमाणेच टॅक्स फ्री असेल मात्र त्याला त्याने ज्या अडत्याला शेतमाल विकला असेल त्या अडत्याचा PAN द्यावा लागेल जे आंदोलकांना अजिबात नको आहे,पण ते तसे स्पष्टपणे सांगू शकत नाहीत.

 अशाप्रकारे पॅन नंबर देण्यात खऱ्या शेतकऱ्यांना कोणतीच अडचण नाही.

जी काही अडचण होणार आहे ती खोट्या शेतकऱ्यांना व अडत्यांना होणार आहे.खोटे शेतकरी म्हणजे कोण?तर जे त्यांचे शेतीव्यतिरिक्त इतर मार्गांनी मिळवलेले उत्पन्न (यांत विविध मार्गांनी मिळवलेला काळा पैसाही आला)हे शेतीतून मिळालेले उत्पन्न आहे असे दाखवतात व त्यावर एरवी जो इन्कम टॅक्स भरावा लागला असता तो वाचवतात.ही सरळसरळ टॅक्स चोरीच आहे.

उदाहरण द्यायचे झाले तर समजा अ नावाचा एक राजकारणी आहे.त्याने 2018 -19 या आर्थिक वर्षात 5 कोटी रुपये अवैध मार्गाने मिळवले आहेत.2018 -19 पर्यंत हा काळा पैसा एक रुपया ही इन्कम टॅक्स न देता पांढरा करण्याचा एक सोपा मार्ग त्याच्या कडे होता.तो म्हणजे शेतमाल विकून 5 कोटी रुपये मिळाले असे दाखविणे.आता हा कायदा 2019-20 या आर्थिक वर्षा पासून लागू झाला आहे.समजा या वर्षी  अ ने सात कोटी रुपये अवैध मार्गाने मिळवले.आता या वर्षी ही इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये त्याने हे 7 कोटी रुपये शेतमाल विकून मिळाले असे दाखवले तर त्याला त्याने ज्या अडत्याला हा शेतमाल विकला त्याचा पॅन नंबर द्यावा लागेल.खोटा पॅन नंबर दिल्यास स्वतःला शेतकरी म्हणवणारा अ अडचणीत येईल.ते टाळण्यासाठी त्याला अडत्याचा खरा पॅन नंबर द्यावा लागेल.मग आता त्या अडत्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ला ही माहिती द्यावी लागेल की अ  कडून विकत घेतलेला शेतमाल त्याने पुढे कोणाला विकला.पण ही माहिती तो अडत्या देऊच शकणार नाही कारण अ बरोबर त्या अडत्याचा जो काही व्यवहार झाला असेल तो फक्त हिशोबातील खोटी बुक एन्ट्री अशा स्वरुपाचा आहे.प्रत्यक्षात त्याच्या हाती कोणताही शेतमाल आलेलाच नाही,मग तो विकल्याची एन्ट्री तो कशी दाखवणार?म्हणजे यापुढे अ नसलेला शेतमाल विकला असे दाखवून अवैध उत्पन्नावर टॅक्स चोरी करू शकणार नाही आणि अडत्या खोट्या रकमेवर कमिशन खाऊन अ ला अशा खोट्या व्यवहारात मदत करू शकणार नाही.म्हणजे हे असे खोटे व्यवहार बंद झाले की अ सारख्या लाचखोरांची टॅक्स चोरी थांबेल व अशा टॅक्स चोरांना मदत केल्यावर मिळणारे अडत्यांचे कमिशन ही थांबेल.

तर ही खरी अडचण आहे.म्हणून आणि म्हणूनच हे कायदे रद्द करा हीच मागणी लावून धरली आहे या आंदोलकांनी.

या वरून एक गोष्ट स्पष्ट होते.हे 3 कायदे रद्द करा या आंदोलकांच्या मागणी मागे प्रचंड मोठ्या प्रमाणावर टॅक्स चोरी चालू ठेवणे हा एकच उद्देश आहे.आणि जे जे लोक आंदोलकांच्या  या मागणीला पाठिंबा देत आहेत ते एक तर स्वतः करप्ट ,भ्रष्ट आहेत किंवा भोळसट आहेत.
आपलाच एक शेतकरी पुत्र सुदाम लक्ष्मण शिंगाडे
महातपुरी ता माजलगाव जि बीड 


 *कृषी कायदा शेतकऱ्याच्या फायद्याचा*

No comments:

Post a Comment