Breaking

Thursday, 18 February 2021

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- महावितरणच्या विरोधातील आमरण उपोषण, मागण्यांचे पूर्ण आश्वासन मिळताच सोडले उपोषण...VBP NEWS ने केला होता पाठपुरावा.


महावितरण च्या विरोधातील आमरण उपोषण मागण्या पूर्ण  आश्वासन मिळताच सोडले आमरण उपोषण
सविस्तर वृत्त-
महेश कृष्णा थिटे यांच्या *आमरण उपोषणाच्या प्रमुख मागण्या -*
1. महेश थिटे यास कामावर हजर करून घ्यावे.
2. श्री. विकास गायकवाड यांच्या सौभाग्य योजनेसाठी काम करून देण्यासाठी 35000/- रु घेतले याबाबत श्री. निलेश वाघमारे (चार्ज, शाखा कार्यालय करकम्ब)  व श्री. सिद्धेश्वर शेळके ( कंत्राटी लाईन हेल्पर)  यांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
3. श्री. अनिल माळी ( लाईनमन, करकम्ब)  हे सेकशन हेड क्वार्टर ला राहतात का? व नाईट ड्युटी केल्याचा बोगस हजेरी अहवाल त्यांनी पाठवला आहे त्याची चौकशी करून तसेच त्या त्या वेळेचे(नाईट ड्युटी चे) त्यांच्या कम्पणीच्या मोबाईल नंबर चे लोकेशन चेक करावे व योग्य ती कार्यवाही करावी. 
वरील मागण्या वर महावितरण कडून महेश थिटे यांना पत्र देण्यात आले. दिनांक - 01 मार्च पासून कामावर रुजू करून घेतले जाईल तसेच मागणी क्र-2 व 3 यावरती चौकशी कमिटी नेमली आहे, समबंधीताची चौकशी मध्ये दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल.
महावितरण व उपोषणकर्ते यामध्ये मध्यस्थाची भूमिका श्री. तानाजी बागल( स्वाभिमानी शेतकरी संघटना, जिल्हाध्यक्ष), श्री. सचिन पाटील ( स्वाभिमानी शेतकरी संघटना, तालुकाध्यक्ष), श्री. महेश खटके, श्री. आप्पासाहेब थिटे (राष्ट्रवादी युवक सोलापूर कार्याध्यक्ष), सोमनाथ थिटे, गणेश मोरे (सरजी), नवनाथ नलवडे, यांनी केली.
महावितरण अधिकारी श्री. भुतडा साहेब( अतिरिक्त उपकार्यकारी अभियंता, विभागीय कार्यालय पंढरपूर) व डॉ. बी.पी. रोंगे सर यांच्या हस्ते लिंबू सरबत उपोषण कर्त्यास देऊन आमरण उपोषण सोडले.
आमरण उपोषणाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला.(राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, बीजेपी, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचीत बहुजन आघाडी) तसेच मोलाचे सहकार्य पत्रकार बांधव, पोलीस अधिकारी, सिद्धार्थ शेंडगे व त्यांची टीम व VBP न्युज चे संपादक विजयकुमार परबत व पंढरपूर तालुका प्रतिनिधी प्रसाद दप्तरदार यांनी या बातमीचा पाठपुरावा केला होता. 

No comments:

Post a Comment