आरोग्य विभागाच्या रुग्णालयांत आता आठ नवीन कॅथलॅब केंद्र!
मुंबई: गेल्या दोन दशकात मृत्यूच्या वेगवेगळ्या कारणांमध्ये हृदयविकाराने अग्रक्रम मिळवला आहे.
तरुण वयात हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे.
हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण बनत असल्याचे लक्षात घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाने तब्बल ८० कोटी रुपये खर्चून आठ मध्यवर्ती ठिकाणी अत्याधुनिक कॅथलॅब सेंटर सुरु करण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे.
देशात तसेच महाराष्ट्रात हृदयविकाराने मरण पावणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत असून या रुग्णांना वेळीच उपचार मिळाल्यास त्यांना वाचवणे शक्य होणार असल्याचे आरोग्य विभागाने अलीकडेच केलेल्या एका अभ्यासात आढळून आले आहे.
यासाठी दोन महिन्यांपूर्वी आरोग्य विभागाने ‘स्टेमी’ नावाचा उपक्रम राबवला.
यात विभागाच्या १२० रुग्णालयात ई.सी.जी. मशिन देण्यात आले आहे.
हृदयविकाराची तक्रार असलेल्या रुग्णाचा ई.सी.जी. काढून हृदयविकाराची समस्या आढळून आल्यास तात्काळ योग्य ती औषध योजना केली जाते.
तसेच रुग्णाला १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून २४ तासात नजीकच्या हृदयउपचार केंद्रात हलवले जाते.
याबाबत आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ सतीश पवार यांनी सांगितले की १९९० दशकात वेगवेगळ्या आजारांनी मरण पावणाऱ्यांमध्ये हृदयविकाराने मरण पावणाऱ्यांचे प्रमाण हे सातव्या क्रमांकावर होते,
मात्र २०१६ मध्ये हृदयविकाराने मृत्यू होण्याचे कारण प्रथम क्रमांकाचे बनले.
वेगवेगळ्या कारणांमुळे गेल्या दोन दशकात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून यावरील उपचार खर्चिक असल्याने आरोग्य विभागाने यासाठी पुढाकार घेणे गरजेचे बनले होते.


No comments:
Post a Comment