अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार......
मुंबई : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ३० वर्षीय तरुणाविरोधात आरे पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
पीडित मुलीच्या आत्याचा तो मुलगा आहे.
त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
आरोपी तरुण व्यावसायिक जहाजांवर कामाला आहे, तर पीडित तरुणी १७ वर्षांची आहे.
ती टाळेबंदीदरम्यान आत्याच्या घरी राहायला गेली होती.
या काळात आरोपी तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
ही तरुणी सात महिन्यांची गर्भवती आहे.
कुटुंबीयांनी उपचारांकरिता तिला वांद्रे येथील रुग्णालयात दाखल केले होते.
तरुणी अल्पवयीन असल्याचे समोर येताच रुग्णालय प्रशासनाने याबाबत पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता.


No comments:
Post a Comment