Breaking

Wednesday, 17 February 2021

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी/ सागर लोखंडे- आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवू ,नव्या पालिका आयुक्तांचा मानस.


आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवू !
नव्या पालिका आयुक्तांचा मानस.........

 पिंपरी : पिंपरी पालिकेचे नवे आयुक्त राजेश पाटील यांनी  मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. 
नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास प्राधान्यक्रम देतानाच लोकाभिमुख प्रशासन देण्याचा तसेच पिंपरी -चिंचवडला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवण्याचा प्रयत्न राहील, असा मानस नव्या आयुक्तांनी व्यक्त केला. 
श्रावण हर्डीकर यांच्या जागी पाटील यांची नियुक्ती झाली. 
 सकाळीच हर्डीकरांकडून पाटील यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. 
राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या विकास ढाकणे यांनीही अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.
 पत्रकारांशी संवाद साधताना पाटील म्हणाले, पिंपरी पालिकेत काम करण्याची संधी मिळाली, त्याचा आनंद आहे. 
आयुक्त म्हणून सर्वासाठी उपलब्ध असू. 
लोकांच्या सहभागातून व सर्वाच्या सहकार्याने लोकाभिमुख प्रशासन चालवू. शहराला नव्या उंचीवर नेण्याचा आपला प्रयत्न राहील. 
नागरिकांच्या आयुक्तांकडून अपेक्षा असतात, त्या अपेक्षांना प्राथमिकता देऊ. 
जास्त बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर राहील. 
पारदर्शक काम करू. 
पिण्याचे पाणी, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य आदी गोष्टींना प्राधान्य राहील.
 शहरासाठी सर्वाधिक महत्त्व कशाला दिले पाहिजे, त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवू.
 एका रात्रीत बदल होणार नाही. 
शहरात टप्प्याटप्प्याने बदल होतील, ते सर्वाना दिसतील. सर्वाची मते विचारात घेऊन निर्णय घेऊ. 
आयुक्तांचा पहिला दिवस आयुक्त राजेश पाटील यांनी  सूत्रे स्वीकारली. 
पालिका अधिकाऱ्यांसमवेत परिचय करून घेतला. 
स्वत:ची ओळख व प्रशासकीय प्रवास सांगितला. विभागप्रमुखांची बैठक घेऊन पालिकेच्या कामांचा आढावा घेतला.


No comments:

Post a Comment