Breaking

Wednesday, 10 February 2021

मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- मोडनिंब येथे बुधवारी महसूल विभागाच्या वतीने प्रलंबित फेरफार विशेष अदालत मोहीम, जागेवरच सात बारा व फेरफार उतारे दुरूस्त करून मिळणार.


मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक 

मोडनिंब येथे बुधवारी महसूल विभागाच्यावतीने प्रलंबित फेरफार अदालत विशेष मोहीम.. जागेवरच सातबारा व फेरफार उतारे दुरुस्त करून मिळणार.. आमदार बबनदादा शिंदे 

माढा तालुक्यातील नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या प्रलंबित नोंद जागेवरच रीतसर करून देण्यासाठी विशेष फेरफार अदालत मोहीम उद्या बुधवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी मोडनिंब येथील शिवपर्वती मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता या फेरफार अदालत मोहिमेचे आयोजन केले असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली. 
माढा तहसील कार्यालयातील 31 जानेवारी 2021 पर्यंत  1150 नोंदी प्रलंबित असून यामध्ये खरेदी-विक्री व्यवहार, बक्षीसपत्र, गहाणखत, हक्कसोडपत्र, वारसनोंदी, पोटहुकूमनामे या सर्व प्रकारांचा समावेश असून यातील बऱ्याच प्रलंबित नोंदी बुधवारी  10 फेब्रुवारी पासून जागेवरच रीतसर करून त्यांचे सातबारा व फेरफार उतारे वाटप केले जाणार आहेत. तरी या विशेष प्रलंबित फेरफार अदालत मोहीम कार्यक्रमास जास्तीत जास्त शेतकरी व नागरिकांनी उपस्थित राहून आपली प्रलंबित असलेल्या नोंदीची कामे रीतसर करून जागेवरच सातबारा व फेरफार उतारे घ्यावेत असे आवाहन आमदार बबनदादा शिंदे यांनी केले आहे. या महसूल विभागाच्या प्रलंबित फेरफार अदालत विशेष मोहीम कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तामामा भरणे, आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय मामा शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार राजेश चव्हाण तसेच संबंधित महसूल अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. 
या विशेष फेरफार आदालत मोहिमेचा प्रारंभ माढा तालुक्यातून केलेला असून या कार्यक्रमास माढा, मोहोळ, आणि करमाळा येथील शेतकरी व नागरिकांना सातबारा उतारा चे वाटप केले जाणार आहे. तरी या प्रलंबित विशेष मोहिमेस जास्तीत-जास्त नागरिकांनी व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार बबनदादा शिंदे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment