Breaking

Tuesday, 9 February 2021

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- आदर्श पाटोद्याचे माजी सरपंच भास्करराव पेरेंवर गुन्हा दाखल.


पंढरपूर तालुका प्रतिनिधी/प्रसाद दप्तरदार- आदर्श पाटोद्याचे माजी सरपंच भास्करराव पेरेंवर गुन्हा दाखल- याबाबत वृत्त असे की ग्रामपंचायत निवडणूकीत मुलीच्या झालेल्या पराभवामुळे आलेल्या नैराश्यातून आदर्श पाटोद्याचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी अर्वाच्य भाषा वापरून पत्रकारांना अपमानित केल्याप्रकरणी भास्करराव पेरेंवर जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक निरमुडकर यांनी फिर्याद दिली आहे, 31 जानेवारी जामखेड तालुक्यातील मोहा येथील ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहातील एका कार्यक्रमात पेरे यांनी केलेल्या भाषणात स्वतः च्या गावातील ग्रामपंचायत निवडणूकीत स्वतःच्या मुलीच्या पराभवामुळे आलेल्या नैराश्यातून, रागातून पत्रकारांना हलकट, हरामखोर असे म्हंटले होते, जामखेड मधील सर्व पत्रकारांनी एकत्रीत येऊन या वक्तव्याचा निषेध करून तहसीलदार व पोलिसांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

No comments:

Post a Comment