Breaking

Saturday, 20 February 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- वंचित बहुजन आघाडी चे माढा तालुका उपाध्यक्ष सिद्धार्थ शेंडगे यांचे मोडनिंब ग्रामपंचायतीसमोर सुरू असलेले उपोषण गटविकासाधिकारी साहेबांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे मागे.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- वंचित बहुजन आघाडी चे माढा तालुका उपाध्यक्ष सिद्धार्थ आप्पा शेंडगे यांचे उपोषण गटविकासाधिकारी साहेबांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे मागे- याबाबत वृत्त असे की वंचित बहुजन आघाडी चे माढा तालुका उपाध्यक्ष सिद्धार्थ शेंडगे हे मोडनिंब ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणाला बसले होते, त्यांचे असे म्हणणे होते की मोडनिंब ग्रामपंचायतीने 2000 साली व 2018 साली मोडनिंब येथील वाॅर्ड क्रमांक 2 मधील खाजगी जागेवरती शासकीय रक्कम खर्च केली आहे व ती जागा एका व्यक्तीच्या नावावरती असून सिटी सर्वेला व ग्रामपंचायतीचा दप्तरी त्या व्यक्तीच्या नावे नोंद आहे व त्याचे सबळ पुरावे माझ्याकडे आहेत व त्या अनुषंगाने मी पंचायत समिती कुर्डूवाडी यांचेकडे व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सोलापूर यांचेकडे याबाबत तक्रार केली आहे व खाजगी जागेवरती शासकीय रक्कम खर्च करता येत नाही, व भ्रष्टाचारासंबंधी मी अनेक वेळा मोडनिंब ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांचेकडे माहिती मागितली असता ती मला मिळत नाही, ग्रामसेवक कोणतीही माहिती द्यायला तयार नाहीत, तसेच गटविकासाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे देखील तक्रार दाखल करण्यात आली होती परंतु मला अद्याप पर्यंत कोणताही न्याय मिळाला नाही, व ग्रामपंचायतीने खाजगी जागेवरती शासकीय रक्कम खर्च केली आहे व भ्रष्टाचारासंबंधी अर्ज केले असता कोणतीही माहिती ग्रामसेवक द्यायला तयार नाहीत असे शेंडगे यांचे म्हणणे आहे, व त्यामुळेच ते मोडनिंब ग्रामपंचायती समोर आमरण उपोषणास बसले होते, सलग दोन दिवस उपोषण सुरू होते व दुसर्या दिवशी संध्याकाळी गटविकासाधिकारी साहेबांनी आपला प्रतिनिधी पाठवुन व पोलिस प्रशासनाच्या मदतीने शेंडगे यांना लेखी देऊन की आपल्या तक्रार अर्जाची 10 दिवसाच्या आत चौकशी करून दोषी असतील तर कारवाई करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिल्यामुळे शेंडगे यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. यावेळी मोडनिंब पोलिस स्टेशनचे भोसले साहेब, आत्तार साहेब, कुर्डूवाडी पंचायत समिती चे सुर्वे साहेब यांनी मध्यस्थी करून शेंडगे यांना ज्यूस देऊन उपोषण मागे घ्यायला लावले यावेळी लोकमत चे पत्रकार मारूती काका वाघ, पत्रकार महादेव गाडे सर, शिवसेना नेते दिपक आबा सुर्वे,  जितू ओहोळ, शाहू-फुले-आंबेडकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रमोद दादा गाडे, ग्रामपंचायतीचे लिपिक अरूण सुर्वे, उपस्थित होते तसेच या घटनाक्रमाचा पाठपुरावा VBP NEWS चे संपादक विजयकुमार परबत यांनी घेतला.

No comments:

Post a Comment