बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे-परळीच्या तरूणीची पुण्यात आत्महत्या- याबाबत सविस्तर वृत्त असे की पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी गेलेल्या परळीच्या 22 वर्षीय तरूणीने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून आत्महत्या केल्याची घटना महमदवाडी येथे उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना रविवारी मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास घडली. पुजा लहू चव्हाण वय 22 सध्या रा. लेन नं.10, हेवनपार्क, मूळ गाव परळी वैजनाथ जि.बीड, असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. वानवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक लगड यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 महिन्यापूर्वी पुजा पुण्यात स्पोकन इंग्लिश च्या क्लासेससाठी आली होती, भाऊ विलास चव्हाण व मित्र अरूण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती,रात्री दिड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मनक्याला गंभीर दुखापत झाली, विलास व अरूण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला,मात्र कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून पुजा चव्हाण यांचा घात कि अपघात अशी चर्चा सुरू आहे.
Monday, 8 February 2021
बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- परळीच्या तरूणीची पुण्यात आत्महत्या.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment