Breaking

Monday, 8 February 2021

मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज- खर्च वेळेत न सादर केल्यास 6 वर्षांसाठी उमेदवार होणार अपात्र.


मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज- खर्च वेळेत न सादर केल्यास 6 वर्षांसाठी उमेदवार होणार अपात्र- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोहोळ तालुक्यातील 76 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी निकाल घोषित झालेल्या दिनांक पासून 30 दिवसाचे आत निवडणूक खर्च विहित नमुन्यात खर्चाच्या पावत्या सह निवडणूक विभागात सादर करणे बंधनकारक आहे जे उमेदवार विहित वेळेत विहित नमुन्यात खर्च सादर करणार नाहीत असे उमेदवार पुढील सहा वर्षांसाठी अपात्र राहतील तसेच त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली आहे खर्च विवरण निवडून आलेले विजयी उमेदवार पराभूत झालेले उमेदवार बिनविरोध निवडून आलेले उमेदवार उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांना खर्च सादर करावा लागणार आहे सदरील खर्च अहवाल उपकोषागार कार्यालय मोहोळ येथे सादर करावयाचा आहे निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसाचे आत म्हणजेच 17 फेब्रुवारी पर्यंत लेखा अधिकारी आर.एम.खांडेकर, उपकोषागार अधिकारी मोहोळ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार जीवन बनसोडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment