Breaking

Monday, 22 February 2021

पुणे जिल्हा प्रतिनिधी/ बिरू कोळेकर- उड्डाण घेताच विमानाच्या इंजिन मध्ये आगीचा भडका.


उड्डाण घेताच विमानाच्या इंजिनमध्ये आगीचा भडका ; 
आकाशातील नाट्यमय थरार......
 
धावपट्टीवरून विमान आकाशात झेप घेतं… 
आकाशात स्थिरावण्याच्या प्रयत्नात असतानाच अचानक विमानाच्या इंजिनामध्ये आगीचा भडका उडतो… 
आता काय होणार म्हणून प्रवाशांना घाम दररून फुटतो… 
एखाद्या सिनेमातील कथेप्रमाणेच अमेरिकेत ही थरारक घटना घडली आहे. 
युनाटेड एअरलाइन्सच्या विमानात शनिवारी ही घटना घडली. 
या घटनेचा व्हि.डी.ओ.ही समोर आला आहे. 
युनाटेड एअरलाइन्सच्या विमानाने डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर ही घटना घडली. 
अमेरिकेच्या विमान वाहतूक संचालन प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिला आहे.
 विमान कंपनीने दिलेल्या माहिती नुसार बोईंग ७७७-२०० हे प्रवासी विमान १० क्रूमेम्बर्स आणि २३१ प्रवाशी घेऊन होनोलूलूकडे निघाले होते. 
डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उडाण घेतल्यानंतर काही वेळातच विमानाच्या इंजिनाने पेट घेतला. 
त्यानंतर विमान तातडीने पुन्हा डेन्व्हेर विमानतळावर उतरवण्यात आलं.
 प्रसंगावधान राखत वेळीच विमान उतरवण्यात आल्याने या थरारक घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.
 विमान उतरवण्यात आल्यानंतर ब्रुमफिल्ड पोलिसांनी विमानाचे फोटो पोस्ट केले आहेत.

No comments:

Post a Comment