शेती पंपाचे वीज कनेक्शन कट केल्यास महावितरणयाचा अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही
कराड ...…. खबरदार थकीत वीज बिलाचे कारण सांगून शेतकऱ्यांचे शेती पंपाचे वीज कनेक्शन कट केल्यास महावितरण च्या आधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिला आहे
साजिद mulha म्हणाले शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे याचे भान महावितरण च्या अधिकाऱ्यांना असले पाहिजे लोकडाऊन च्या काळात अनेक उद्योग धंदे बंद पडले . परंतु एकच उद्योग चालू होता तो म्हणजे शेती ,लोकडाऊन च्या काळात सर्वसामान्य जनतेला अन्नपुरवठा करण्याचे काम शेतकऱ्याने केले आहे . उद्योग धंदे वाल्यांची बिले सरकार माफ करत आहे . त्यांना वेगवेगळ्या सवलती देत आहेत . मात्र शेतकऱ्यांना सवलती देताना सरकार नियम व निकष लावत आहे त्यामुळे ते खपून घेतले जाणार नाही असा इशारा दिला आहे.


No comments:
Post a Comment