मोडनिंब प्रतिनिधी विनोद नागटिळक
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, बहुजनाचे कैवारी, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजन्मोत्सव 2021 प्रणित महाराज ग्रुप मोडनिंब यांच्यावतीने ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून जयघोष देऊन शांततेत शिवजयंती साजरी करण्यात आली. शासनाने ठरवून दिलेल्या कोरणाबद्दलचे नियम व अटींचे पालन करून, सोशल डिस्टन्स ठेवून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी मोडनिंब ग्रामपंचायतचे सर्व नूतन सदस्य, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, बालाजी भाऊ पाटील, विशंभर पाटील, अमोल जाधव, अजित पाटील, आकाश पाटील, दादा शितोळे, विशाल भैय्या पाटील, वैभव पाटील, ऋषी पाटील, प्रथमेश पाटील, शिवराज पाटील, शंभु सुर्वे, संकेत सुर्वे, अमोल पाटील, विनायक सुर्वे, अजिंक्य निकम, राज पाटील, आनंद पवार, आकाश चौगुले, संतोष पवार, प्रतीक पाटील, निसर्ग नाझरे, शिवानंद नाझरे, अतुल पाटील, निलेश नाझरे, कैलास काटकर,आण्णा काटकर, शुभम पाटणे, सोन्या पवार, गणेश जमदाडे, ज्ञानेश्वर जामदाडे, बापू काटकर, संकल्प गायकवाड आदी सर्व युवक कार्यकर्ते शिवजयंतीला उपस्थित होते.


No comments:
Post a Comment