Breaking

Wednesday, 17 February 2021

महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी/ एम.एम.आर.डी.ए.आयुक्तांना समन्स.


एम.एम.आर.डी.ए. आयुक्तांना समन्स......
 
‘टॉप्स ग्रुप’ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने(ई.डी.) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एम.एम.आर.डी.ए.) आयुक्त आर. ए. राजीव यांना समन्स जारी करत  चौकशीस बोलावले आहे, तर राजीव हे चौकशीला हजर राहतील, अशी माहिती एम.एम.आर.डी.ए.कडून देण्यात आली. 
‘टॉप्स ग्रुप’ कंपनीचे प्रमुख राहुल नंदा यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना हाताशी धरत एम.एम.आर.डी.ए.ला सुरक्षारक्षक पुरविण्याचे कंत्राट मिळवले. 
कंत्राटानुसार ३५० सुरक्षारक्षक ‘टॉप्स ग्रुप’ कंपनीने पुरवणे अपेक्षित होते.
 मात्र कंपनीने कमी सुरक्षारक्षक पुरवले आणि ३५० सुरक्षारक्षकांनुसार पगाराची रक्कम एम.एम.आर.डी.ए.कडून वसूल केली, असा आरोप करणारी तक्रोर ‘टॉप्स ग्रुप’चे माजी पदाधिकारी रमेश अय्यर यांनी मे.दंडाधिकारी न्यायालयात केली होती. 
मे.न्यायालयाने या प्रकरणी यलो गेट पोलिसांना दखलपात्र गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले.
 गुन्हा दाखल होताच ‘ई.डी.’ने या प्रकरणाचा तपास हाती घेतला. 
‘ई.डी.’ने या प्रकरणी सरनाईक यांचा निकटवर्तीय अमित चांदोले याला अटक केली, तर सरनाईक, त्यांचे पुत्र विहंग, पूर्वेश यांची चौकशीही  केली. 
काही दिवसांपूर्वी ‘ई.डी.’ने एम.एम.आर.डी.ए.ला सुरक्षारक्षकांचे नियोजन, पर्यवेक्षण, पगार आदीबाबत तपशीलवार माहिती पुरविण्यास सांगितले होते. 
त्यानुसार एम.एम.आर.डी.ए.ने ‘ई.डी.‘ला लेखी माहिती पुरवली. 
त्यात एम.एम.आर.डी.ए.ने उभारलेल्या प्रकल्पांची सुरक्षा, प्रकल्पस्थळांवर अतिक्रमण होऊ नये यासाठी कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक घेतले होते. 
सुरक्षा रक्षक पुरवणारी ‘टॉप्स ग्रुप’ही त्यापैकी एक  कंत्राटदार कंपनी आहे. 
सुरक्षारक्षकांची हजेरी, वेतनकपात, नुकसान झाल्यास भरपाईची पद्धत याबाबत ‘ई.डी.’ला माहिती पुरवली होती.

No comments:

Post a Comment