Breaking

Monday, 8 February 2021

मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- मोडनिंब येथील ईशान शहाची राष्ट्रीय फिल्ड आर्चरी साठी निवड.


मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक-  मोडनिंब येथील ईशान शहा ची राष्ट्रीय फील्ड आर्चरी साठी निवड-
वारणानगर कोल्हापूर येथे पार पडलेल्या ९ व्या राज्यस्तरीय फील्ड आर्चरी स्पर्धेत मोडनिंब येथील ईशान शहा याने १० वर्ष गटामध्ये २ रा क्रमांक पटकावला ईशान ने  सिंगल स्पॉट शुटिंग मधे सिल्व्हर ५ स्पॉट प्रकारात सिल्व्हर,ओव्हर ऑल परफॉर्मन्स सिल्व्हर ,अशी एकुण ३  सिल्व्हर पदके जिंकली.

तसेच ईशान ची पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी १० वर्षा खालील वयोगटातील महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली.

वारणानगर कोल्हापूर येथे राज्यस्तरीय स्पर्धा ६ व ७ फेब्रुवारी रोजी पार पडली   सदर स्पर्धेत संपुर्ण राज्यातून २५० खेळाडुंनी सहभाग नोंदवला.

ईशान ला प्रशिक्षक विठ्ठल भालेराव सर दिपक चिकने सर मनिष नाईकनवरे सर रमेश शिरसट सर मोहिनी गाजरे मॅडम व मनिषा देशमुख मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment