Breaking

Monday, 8 February 2021

मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या प्रश्नांसाठी प्रशासकीय बैठक लावण्याचे आ माने यांचे आश्वासन.


मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- मोडनिंब प्रतिनिधी विनोद नागटिळक
*ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रशासकीय बैठक लावण्याचे आमदार माने यांचे आश्वासन*-
*ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या 10% नोकर भरतीवरील निर्बंध तात्काळ उठवावेत, वेतन श्रेणी, पेन्शन, आकृतीबंध सुधारित करणे, सुधारित किमान वेतनासाठी शासनाकडून 100% अनुदान मिळावे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी लावण्यात आलेली वसुलीची अट रद्द करण्यात यावी, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या भविष्यनिर्वाह निधीची खाती कामगार निधी संघटन (ESIC) या कार्यालयाकडे  वर्ग करावीत, ग्रॅज्युटी रक्कम 50 हजार ऐवजी 10 लाख रुपये करण्यात यावी, ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर व गावातील बॉडी बदलल्यानंतर कामगारांना विनाकारण कामावरून काढून टाकण्याचे प्रकार थांबवावेत. इत्यादी प्रलंबित विविध अडीअडचणी व प्रश्न सोडवण्यात यावेत अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे ग्रामपंचायत कर्मचारी युनियन चे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव कार्याध्यक्ष मोहन लामकाने यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ चे आमदार मा. यशवंत माने साहेब यांची भेट घेऊन त्यांना  कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे लेखी निवेदन दिली असल्याची माहिती  ग्रामपंचायत युनियनचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अरुण काका सुर्वे यांनी दिली आहे.
यावेळी आमदार यशवंत माने यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या तक्रारीसंदर्भात निवेदने आलेली आहेत. तुमच्या प्रश्नासाठी मा. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात प्रशासकीय बैठक लावण्यासाठी प्रयत्न करणार असून तुमचा अनेक दिवसापासूनच्या  प्रलंबित  प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन कर्मचारी शिष्टमंडळास दिले आहे.
यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे नवनाथ कांबळे, छाया लोंढे, बंडू चंदनशिवे, धोंडीबा माडकर, दिलीप शिरसागर, भगवान कांबळे, अशोक वाघमोडे, पांडुरंग खरात, देशमाने डोलारे व इतर कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment