मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक
सोलापूर जिल्ह्यातील 7 तालुक्यातील सरपंच व उपसरपंच निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला-- मिलिंद शंभरकर सोलापूर जिल्हाधिकारी यांचा आदेश
मा.उच्च न्यायालय,मुंबई यांनी पारित केलेल्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, माढा, मोहोळ, माळशिरस, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे आदेश सोलापूर जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी काढले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 682 ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत. यामध्ये 1 हजाराहून अधिक ग्रामपंचायत सदस्य मधून 27 जानेवारी 2021रोजी सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली होती. तसेच 9/02/2021, 11/02/2021, 13/02/2021 रोजी सोलापूर जिल्ह्यातील सरपंच निवडीचा कार्यक्रमजाहीर केला होता. परंतु न्यायालयीन तक्रारीनंतर सरपंच पदाच्या होणाऱ्या निवडी पुढे ढकलण्यात आले असल्याचे लेखी आदेश जिल्हाधिकारी साहेब यांनी काढले आहेत. तसेच करमाळा, बार्शी, मंगळवेढा, उत्तर सोलापूर तालुक्यामधील सरपंच पदाच्या निवडी नियोजित तारखेला पार पाडण्याचे देखील आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आता नक्की सरपंच निवड होणार? की पुन्हा आरक्षण सोडत होणार? याकडे सर्व नवनिर्वाचित सदस्य, पॅनेल प्रमुख, गाव कारवारी, गाव पुढारी यांचे लक्ष लागले आहे.


No comments:
Post a Comment