Breaking

Tuesday, 16 February 2021

पुणे जिल्हा प्रतिनिधी/ बिरू कोळेकर-राज्यात मागील 24 तासात 3 हजार 365 नवे कोरोना बाधित , 23 रूग्णांचा मृत्यू.


 राज्यात मागील २४ तासांत ३ हजार ३६५ कोरोनाबाधित वाढले ;
 २३ रुग्णांचा मृत्यू.....
 
राज्यातील कोरोनाचा संसर्ग मागील काही दिवसांपासून मोठ्याप्रमाणावर वाढताना दिसत आहे. 
दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या व कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. 
कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या तुलनेत नवे कोरोनाबाधित हे अधिकच आढळून येत आहेत. 
 राज्यात ३ हजार ३६५ नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले असून, ३ हजार १०५ जण कोरोनातून बरे झाले. 
याचबरोबर दिवसभरात २३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.
 राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २० लाख ६७ हजार ६४३ वर पोहचली आहे. 
आतापर्यंत एकूण १९ लाख ७८ हजार ७०८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. 
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता (रिकव्हरी रेट) ९५.७ टक्के झाले आहे. 
तर, राज्यात एकूण ३६ हजार २०१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 
आजपर्यंत राज्यात ५१ हजार ५५२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 
ए.एन.आय.ने ही माहिती दिली आहे. 
 राज्यातील कोरोनाचा संसर्ग मागील काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे.
  एकाच दिवसात चार हजारापेक्षा अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. 
यामुळे प्रशासन काही कठोर पावलं उचलण्याच्या विचारात असल्याचं दिसत आहे. 
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  पत्रकारपरिषदेत बोलताना तसा सूचक इशारा दिला व नागिरकांनी मानसिकता तयार ठेवावी, असं देखील त्यांनी सांगितलं. 
तसेच, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांसोबत चर्चा करणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली.

No comments:

Post a Comment