Breaking

Tuesday, 16 February 2021

पुणे जिल्हा प्रतिनिधी/ बिरू कोळेकर- रेल्वे स्थानकात तरूणाचा धिंगाणा.


रेल्वे स्थानकात तरुणाचा धिंगाणा,
स्टेशन मास्तर कार्यालयात मोडतोड; 
लोहमार्ग पोलिसांवर चाकूने हल्ल्याचा प्रयत्न.....

 मुंबई : शिवडी रेल्वे स्थानकात एका २२ वर्षीय तरुणाने लोहमार्ग पोलिसांना चाकूचा धाक दाखवत स्टेशन मास्तर कार्यालयातील सामानाचीही मोडतोड केली. 
 घडलेल्या या घटनेत वडाळा लोहमार्ग पोलिसांनी या तरुणाला अटक केली.
 मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या तरुणाचे नाव अकमत खान असे आहे. 
अकमत खान  सकाळी ८.२० च्या सुमारास  शिवडी स्थानकातील फलाट क्रमांक १ वर आला होता.
 त्या वेळी स्थानकात कार्यरत असलेल्या गृहरक्षकाला त्याने ‘ए मामा’ म्हणून हाक मारली. 
गृहरक्षकाने त्याला काय ? झाले विचारले असता अकमतने वाद घालण्यास सुरुवात केली. 
त्याच्या कमरेला चाकू सारखे शस्त्र दिसताच गृहरक्षकाने त्याबाबत विचारणा केली असता अकमतने चाकू काढून हल्ला करण्याचा पवित्रा घेतला.
 त्या वेळी गृहरक्षक व अन्य रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडील चाकू  हिसकावून घेतला आणि त्याला स्टेशन मास्तर कार्यालयात आणून बसविले. 
अकमतने कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला.
 टेबलावरील काच उचलून फोडली आणि फुटलेल्या काचेवर आपले डोके आपटून जखम करून घेतली. 
फुटलेल्या काचेचा तुकडा त्याने गृहरक्षक व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दिशेनेही भिरकावली. 
त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतानाही तो हिंसक होत होता. 
वारंवार तो शिवागाळ व धमक्या देत होता. 
त्याने काचेच्या तुकडय़ाने गृहरक्षकाला मारण्याचाही प्रयत्न केला. 
तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने स्टेशन मास्तर कार्यालयात त्याला बंद करण्यात आले. 
वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्याकडून मदत मागविण्यात आली आणि वडाळा लोहमार्ग पोलिसांची कुमक येईपर्यंत अकमतने कार्यालयातील काचा फोडून टाकल्या.

No comments:

Post a Comment