प्रेमदिनी १४ अपंगांचा विवाह,
आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सामूहिक विवाह सोहळा ........
चंद्रपूर : गौरवबाबू पुगलिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वरोरा येथील आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टद्वारा येथील गौरव सेलिब्रेशन लॉन येथे अंपगांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला.
या सोहळ्यात १४ अपंग जोडप्यांचे लग्न लागले.
या जोडप्यांमध्ये नांदेड वगळता विदर्भातील अमरावती, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ या जिल्ह्यातील अंपगांचा समावेश होता.
गेल्या १७ वर्षांत २६५ अपंगांचे विवाह लावून त्यांना समाजात प्रतिष्ठित जीवन जगण्यासाठी सहकार्य करण्यात संस्थेला यश आले आहे.
शनिवारी मेहंदीचा कार्यक्रम झाला.
त्यानंतर संगीताचा कार्यक्रम पार पडला.
महाकालीचे दर्शन घेऊन वरात काढण्यात आली.
त्यानंतर सामूहिक विवाह सोहळा पार पडला.
यावेळी त्यांना नव्या विवाह जीवनासाठी आशीर्वाद दिला.
कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया, आमदार किशोर जोरगेवार, विद्युत केंद्राचे अभियंता पंकज सपाटे, ए.सी.सी. कंपनीचे व्यवस्थापक अनिल गुप्ता, अनिल लुनिया, समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, डेबू सावली वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सुभाष शिंदे, रोटरी क्लबचे महेश उचके, मनीष बोराडे, राहुल ठेंगणे आदींची उपस्थिती होती.
यावेळी सर्व दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर गौरवबाबू पुगलिया स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबीर घेण्यात आले.
यावेळी आस्था ट्रस्टचे कार्य अत्यंत उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्दगार नरेश पुगलिया यांनी काढले.
यावेळी जोडप्यांना संसारोपयोगी साहित्य व शिवणयंत्र भेट देण्यात आले


No comments:
Post a Comment