Breaking

Wednesday, 27 January 2021

सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते - cms परिवाराकडून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात.


सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते- cms परिवाराकडून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात- 

*एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे आपल्या परिवारातील सर्व सदस्य एकमेकांना शक्य तेवढी मदत करत आहेत.एकमेकांच्या अडचणीत हाकेला धावून येत आहेत. खऱ्या अर्थाने आपल्या छत्रपती मराठा साम्राज्य  CMS मराठा सातारकर परिवार आपल्या परिवारातील सदस्यांची कुटूंबियांप्रमाणे अगदी त्याहून जास्तच सहकार्य आणि मदतीचा हात देत आहेत.हेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आणि शिकवण आहे* 
*ठिकाण नंबर - १*
*दिनांक- २६/०१/२०२१ रोजी*
*ठिकाण- श्री.तारकेश्वर माध्यमिक विद्यालय, पाबळवाडी,पो. वजरोशी, ता. पाटण, जि. सातारा*
*ठिकाण नंबर - २*  
*दिनांक- २६/०१/२०२१ रोजी*
*ठिकाण - श्री कासाई देवी आश्रमशाळा, अंधारी*
*तालुका - जावळी, जिल्हा - सातारा*

*आज २६ जानेवारी २०२१ रोजी आपल्या CMS परिवाराने गरजूवंत विद्यार्थी विद्यार्थिनी यांना शालेय पाठ्यपुस्तके व साहित्य हे आपल्या समाजकार्य मधून वाटप केले. अप्रतिम असे कार्य पार पडलं आहे. यावेळे  मुलांच्या डोळ्यातील आंनद आपल्या ग्रुप ला खरच एक नवीन उभारी प्रोस्ताहन देवुन गेला ... कार्यक्रमास उपस्थिती सर्व CMS Admin व CMS परिवारातील सदस्य  हे देखील उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment