Breaking

Wednesday, 27 January 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी मंगळवेढा तहसीलदार सो यांना निवेदन.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी मंगळवेढा तहसीलदार सो यांना निवेदन- बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी, यासाठी मा. तहसीलदार साहेब मंगळवेढा, यांना निवेदन देण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की 
युवा जिल्हाध्यक्ष मा. गणेश देवकते यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. त्या वेळी ते म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटने मध्ये धनगर समाजाला हक्क अधिकार दिले आहेत. धनगर समाजाला घटनेने बहाल केलेले अनुसूचित जमातीची अंमलबजावणी करावी. महाराष्ट्रातील सर्व प्रस्तापित राज्य सरकारने धनगर समाजाची दिशाभूल करून तोंडाला पाने पुसण्याची कामे केली आहेत. विद्यमान सरकारचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पंढरपूर येथे धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली जाईल असे म्हंटले होते, परंतू ठाकरे सरकारने अरक्षणाबाबद कोणतीही कार्यवाही केलेली नाही. जर राज्य सरकारने येत्या काही दिवसात धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावी बाबद कोणताही निर्णय  घेतला नाही तर बहुजन सत्यशोधन संघाच्यावतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवा जिल्हाध्यक्ष मा. गणेश देवकते यांनी दिला. तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी  त्वरित करावी. युती सरकारने धनगर समाजास केलेले अनुसूचित जातीच्या योजनेसाठी मंजूर केलेले एक हजार कोटी रुपये निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा, शेळी व मेंढी विकास महामंडळास पाचशे कोटी रुपये भागभांडवल द्यावे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे मुबंई चर्चगेट येथे भव्य स्मारक उभे करावे, महाराष्ट्रात मेंढपाळावरती हल्ले होत आहेत यासाठी स्वतंत्र कायदा करावा, अश्या मागण्या करण्यात आल्या.
 त्यावेळी जिल्हाध्यक्ष मा. प्रदीप परकाळे बोलताना म्हणाले महाराष्ट्रात धनगर समाज हा संख्येने मोठया प्रमाणात आहे, त्यांना घटनेने दिलेले अधीकार मिळाले पाहिजेत. या ब्राह्मणी व्यवस्थेने धनगर आणि धनगड असा वाद लावून धनगर समाजाची दिशाभूल केली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्ष झाली आहेत तरीही धनगर च धनगड करता आलेल नाही. केंद्रात आणि राज्यात ब्राम्हणाची सत्ता असल्यामुळे धनगर समाजावर अन्याय होत आहे. आता आपण युवकांनी एकत्र येऊन धनगर समाजाच्या हक्कासाठी, अधिकारासाठी काम केले पाहिजे. शत्रू आणि मित्र कोण याची जाणीव करून घेतली पाहिजे. येणाऱ्या काळात जर धनगर आरक्षणाबाबद कोणताही निर्णय घेतला नाही तर राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात येईल असे सांगितले. 
त्यावेळी युवा जिल्हा सचिव काशीलिंग  रणदिवे,सुरेश पाटील,जावेद मुलांनी,अंबादास वंगीकर,निलेश माने,मनोहर खडतरे, दया ढोणे,सुरज बोरामणिकर,विशाल जगताप,योगेश कामात,बापू मदने,सुनिल थिटे,भारत शिंदे,सचिन लवटे, समाधान लवटे, सुरेश शेंडगे,प्रवीण खांडेकर,प्रल्हाद दोलतोडे,अक्षय शिंदे,बाबा शिंगाडे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment