Breaking

Wednesday, 27 January 2021

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- ऊर्जामंत्री, ऊर्जा सचिव, कार्यकारी संचालक महावितरण यांच्यावरती फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मागणी.


माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे-   ऊर्जामंत्री, ऊर्जा सचिव, कार्यकारी संचालक महावितरण यांच्यावरती फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मागणी- याबाबत सविस्तर वृत्त असे की सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सरचिटणीस ,सहकार सेना ,प्रदेशाध्यक्ष   श्री दिलीप बापू धोत्रे व सोलापूर 
जिल्हाध्यक्ष मा प्रशांतजी गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेतर्फे महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री 
श्री.नितीन_राऊत यांच्यासह ऊर्जा_सचिव व कार्यकारी_संचालक_महावितरण यांच्या विरोधात संगनमत करून मानसिक क्लेश, आर्थिक लुबाडणूक व फसवणूक केल्याचा गुन्हा_दाखल करण्यात यावा अशी मागणी  मनसे माढा तालुकाध्यक्ष मा सुभाष बापू खटके व 
मनसे विद्यार्थी सेना माढा तालुकाध्यक्ष मा राहुल सुर्वे यांनी माढा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment