सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - निरा उजवा आणि डाव्या कालव्या संदर्भात कालवे सल्लागार समितीची रब्बी हंगाम २०२०-२१ साठीची बैठक उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे अध्यक्षतेखाली व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे उपस्थितीत पुणे येथे पार पडली.
यावेळी माळशिरस तालुक्यातील
बांगर्डे,तिरवंडी,अकलुज,सराटी,माळीनगर,ओझरे-तांबवे या सहा KT वेअर च्या जिर्ण झालेल्या बांधकामाचा प्रश्न उपस्थित करुन,होणारी गळती रोखण्यासाठी त्वरीत काँक्रेटीकरण करणे गरजेचे असुन स्पेशल रिपेरींग फंडातुन सदर कामांना प्रशासकिय मंजुरी असुन त्या कामांचे टेंडर तात्काळ करण्यात यावीत याकडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे लक्ष वेधले.
निरा उजव्या कालव्याची वहनक्षमता सद्दस्थितीमधे १५५० क्युसेक असुन ती अतिरिक्त ४०० क्युसेक ने वाढवण्यात यावी किंवा निरा उजव्या कालव्यास ७७ मैलापर्यंत समांतर बंद पाईपलाईन करण्यात यावी अशी आग्रही मागणी केली. यामुळे पाणी वितरणाचा कालावधी कमी होणार असुन बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होउन पाण्याची बचत होणार असल्याने एक जादा आवर्तन देणे शक्य होणार असल्याचे यावेळी सांगितले.
कारुंडे तलावावरील जलसेतु व कालवा दुरुस्तीचे काम विशेष दुरुस्ती निधीतुन मंजुर आहे तरी या कामाचे टेंडर लवकरात लवकर काढण्यात यावे अशी मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केली यावर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी संबधित अधिकार्यांना जागेवरच सुचना केल्या.आणि विशेष दुरुस्ती निधितुन मंजुर झालेली कामे येणार्या पावसाळ्याच्या अगोदर तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले. यावेळी खा. गिरीश बापट,आ.रणजितसिंह मोहीते पाटील, आ.प्रशांत परिचारक,आ.शहाजीबापु पाटील,आ.राम सातपुते,आ.दिपक चव्हाण,आ.राहुल कुल,विविध साखर कारखान्यांचे प्रतिनिधि,जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment