वैराग शहर प्रतिनिधी/ योगेश भालशंकर- वैराग शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समाधान पवार यांचा सत्कार- याबाबत सविस्तर वृत्त असे की *प्रामाणिकपणे काम केल्यानंतर त्याचं एक ना एक दिवस कुठेतरी कौतुक होतेच याची आज पुन्हा एकदा प्रचिती आली, पुणे पदवीधर निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय अरुण अण्णा लाड साहेब यांचे प्रामाणिकपणे काम करून जोरदार प्रचार केल्यामुळे सांगली येथील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी वैराग येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समाधान पवार यांच्या संपर्क कार्यालयात त्यांची भेट घेऊन समाधान पवार यांचा सत्कार केला व कामाचे कौतुक केले.. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला काम करण्यासाठी हीच ऊर्जा महत्वाची आहे..नक्कीच यापुढेही आपल्या पाठिंब्याच्या जोरावर मी असेच प्रामाणिकपणे काम करत राहील... हा सत्कार माझ्या एकट्याचा नसून आपल्या सर्वांचा आहे असे मत समाधान पवार यांनी व्यक्त केले आहे.
Friday, 1 January 2021
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment