Breaking

Monday, 7 December 2020

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - शेतकरी संपात सहभागी होण्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती कुर्डूवाडी उपसभापती सुहास काका पाटील यांचे आवाहन.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - शेतकरी संपात सहभागी होण्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती कुर्डूवाडी उपसभापती सुहास काका पाटील यांचे आवाहन- *कृषि उत्पन्न बाजार समिती कुर्डूवाडी ता.माढा कडून आवाहन* करण्यात येते की, मंगळवार दिनांक 08-12-2020  रोजी असलेल्या *भारत बंद* मध्ये  महाराष्ट्र राज्य बा. स. सहकारी संघ मर्या. पुणे  व महाराष्ट्र राज्य कर्म. संघ पुणे यांनी  संपात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे केंद्र शासनाने केलेल्या  *कृषि विषयक कायदयास विरोध* म्हणून विविध शेतकरी संघटनांनी  पुकारलेल्या बंदला पाठिंबा देणे करिता सर्व शेतकरी, आडते,  खरेदीदार,मुख्ययार्ड कुर्डूवाडी व सबयार्ड मोडनिंब टेंभुर्णी व माढा येथील सर्व जागाधारक, हमाल, मापाडी बांधवांनी बंदला पाठींबा देण्यासाठी,
 *कृषि उत्पन्न बाजार समिती कुर्डूवाडी ता.माढा* चे  कामकाज व्यवहार बंद ठेवून सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आदेश 
 मा.सुहास (काका) पाटील* उपसभापती कृउबास कुर्डूवाडी
  *मा.अजिनाथ बोंगाळे*
 प्र.सचिव कृउबास कुर्डूवाडी
व सर्व संचालक मंडळ कृउबास कुर्डूवाडी ता.माढा.जि.सोलापूर. यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment