Breaking

Monday, 7 December 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- शेतकरी बांधवानी भारत बंद मध्ये सहभागी व्हावे.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार-

*शेतकरी बांधवांनी भारत बंदमध्ये सहभागी व्हावे*

*नाकृबा सभापती देविदास पिंगळे यांचे आवाहन*

*नाशिक : 
केंद्र सरकारने लागू केलेल्या तीनही कृषि कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी मंगळवारी (दि. ८) पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सर्वच कृषि उत्पन्न बाजार समित्याही बंद राहणार आहेत. नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीही त्याला अपवाद नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीला अडथळा निर्माण होऊन शेतमालाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हे नुकसान टाळण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सोमवारी ( दि.७) आपल्या शेतातील शेतमालाची मोठ्या प्रमाणात तोड करू नये, शेतकऱ्यांनीही आपला केवळ एक दिवस या आंदोलनाला द्यावा, असे आवाहन नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी खासदार देविदास पिंगळे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
केंद्र सरकारने केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. त्यामुळेच हजारोंच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरला असून, या कायद्यांना कडाडून विरोध केला आहे. दिल्लीच्या रस्त्यावर कडाक्याच्या थंडीतही बायका मुलांसह शेतकरी ठाण मांडून आहेत. तरी निर्दयी सरकारला त्यांची दया येत नाही, ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे पिंगळे यांनी म्हटले आहे. केंद्र सरकार विरोधात जनतेतही मोठ्या प्रमाणात रोष वाढतच चालला असून, आता देशभरातील शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. या संघटनांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच पुकारलेल्या मंगळवारच्या (दि.८) आंदोलनाला पाठिंबा म्हणून नाशिक कृषी बाजार समितीदेखील बंद राहणार असल्याचे पिंगळे यांनी पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे नाशिक बाजार समितीत पालेभाज्या, फळभाज्या, कांदा, बटाटा, लसूण आदी शेतमाल घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.७) शेतातून जास्त मोठ्या प्रमाणात शेतमालाची तोडणी करून ठेऊ नये, तसेच जो शेतमाल आहे, तो सोमवारी (दि.७) बाजार समिती सुरू असल्याने घेऊन यावा, परंतु, मंगळवारी (दि. ८) भारत बंद असल्याचे लक्षात घेवून या बंदमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहनही पिंगळे यांनी केले आहे. 

*शेतमालाची तोड करू नये*
केंद्र सरकारच्या कृषि विषयक तिन्ही कायद्यांमुळे शेतकरी भरडला जाणार आहे. देशातल्या सर्व बाजार समित्या भरडल्या जाणार आहेत.त्यामुळे पुकारलेल्या भारत बंदमुळे बाजार समितीही बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.७) शेतमालाची तोड करू नये. शेतकऱ्यांचा शेतमाल खराब होऊ नये आणि त्यांचे नुकसान टळावे, यासाठी खबरदारी म्हणून त्यांना आवाहन करण्यात आले आहे.
*- देविदास पिंगळे, सभापती, नाशिक कृषि उत्पन्न बाजार समिती*

No comments:

Post a Comment