मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- 🌺🌷 *छत्रपती परिवार व शिक्षक समितीच्या वतीने रणजितसिंह डिसले यांचा सत्कार* 🌺🌷
*140 देशातील तब्बल 12000 नामांकन प्राप्त* शिक्षकांतून अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या *10 शिक्षकांमधून " ग्लोबल टिचर्स अवाॕर्ड " विजेत्या रणजितसिंह डिसले यांचा छत्रपती परिवार व मंगळवेढा शिक्षक समितीच्या* वतीने सत्कार करण्यात आला.
तब्बल *सात कोटी* रुपयांचा जागतिक किर्तीचा बहुमान डिसले यांनी पटकाविला आहे. *परितेवाडी* सारख्या शैक्षणिक दृष्ट्या उपेक्षित शाळेवर 2009 पासून त्यांनी अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून आपले वेगळेपण दाखवून दिले होते. त्यांच्या अंगी असलेले कौशल्य व क्षमता विचारात घेऊन *मरवडेच्या व्यासपीठावर 10 मार्च 2011 मध्ये उपक्रमशिल शिक्षक पुरस्कार देऊन गौरव* करण्यात आला होता.
*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व छत्रपती परिवाराच्या* संयुक्त विद्यमाने राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात *आ. भारतनाना भालके , समितीचे तत्कालीन राज्याध्यक्ष नाना जोशी , भिमा शुगरचे चेअरमन धनंजय महाडीक , दामाजी शुगरचे तत्कालीन चेअरमन अॕड. नंदकुमार पवार* यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला होता .


No comments:
Post a Comment