Breaking

Monday, 7 December 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- शेतकरी संपाला शेतकरी संघर्ष संघटनेचा जाहीर पाठिंबा...हुलजंती बंद.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार-शेतकरी संपाला शेतकरी संघर्ष संघटनेचा जाहीर पाठिंबा...हुलजंती बंद- उद्या हुलजंती बंद:शेतकरी संघटनांच्या समर्थनात;कृषी कायद्याच्या विरोधात
 : कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या उद्याच्या बंदला हुलजंती येथील शेतकरी संघर्ष  संघटनेचा पाठिंबा जाहीर केला आहे. तरी उद्या हुलजंती बंद ठेऊन या आंदोलनाला पाठींबा देणार असल्याची भूमिका शेतकरी संघर्ष  संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस श्रीकांत सोमुत्ते यांनी आज स्पष्ट केली आहे.
उद्याचा बंद हा वेगळ्या प्रकारचा बंद आहे. यात राजकीय पक्षांचा सहभाग असला तरी हा राजकीय बंद नाही. कुठल्याही राजकीय पक्षाच्या वा संघटनेच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी हा बंद नाही.
देशातील शेतकऱ्यांचा आवाज बुलंद व्हावा. गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर थंडी, वारे व सरकारच्या दडपशाहीची पर्वा न करता जे शेतकरी बांधव बसले आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा बंद आहे.
लॉकडाऊनच्या काळात सगळे घरात बसलेलो असताना एकटा शेतकरी राजा राबत होता. आज त्यांनी आपल्याला साद घातलीय. त्याला गरज आहे. त्यावेळी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. त्यामुळं हा जनतेनं स्वेच्छेनं बंदमध्ये सहभागी व्हावं व बळीराजाच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करावी,’ असं आवाहन अनेक सामाजिक संघटना व विविध पक्षांनी केलं आहे. याच समर्थनात उद्या शेतकरी संघर्ष संघटना हुलजंती बंदचा निर्णय घेतला असल्याचे श्रीकांत सोमुत्ते यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment