माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- पडसाळी येथील सिना-माढा वितरिकेचे भूमिपूजन-*पडसाळी येथील सीना माढा वितरेकेचे भूमिपूजन* दि 7 डिसेंबर 2020 रोजी शिवसेना जिल्हा समन्वयक *मा.प्रा.शिवाजीराव सांवत साहेब* यांच्या अध्यक्षतेखाली *मा.आमदार बबनराव शिंदे साहेब* व *संजय बाबा कोकाटे* शिवसेना युवक नेते यांच्या शुभहस्ते मौजे पडसाळी येथे पार पडला. मागील 2 वर्षांपासून शिवसेना तालुकाप्रमुख *मधुकर देशमुख* युवासेना उपतालुका प्रमुख *जयदेव पवार व शिवसैनिक शेतकरी शिवसेना उपनेते तानाजी सांवत यांच्या माध्यमातून शिवसेना नेते *मा.ना.विजयबापु शिवतारे साहेब* माजी राज्यमंत्री जलसंपदा यांच्या कडे पाठपुरावा करत होते. सदर प्रश्नी जयदेव पवार यांनी आत्मदहनाचा इशारा ही दिला होता.
योजनेच्या कामाचा शुभारंभ झाल्याने शेतकरी वर्ग आनंदात असून पडसाळी, सोलनकरवाडी, अरण, आणि मोडनिंब येथील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यावेळी बोलताना *आमदार बाबनरावजी शिंदे साहेब* यांनी योजने ला निधी कमी पडून देण्याची ग्वाही दिली तर *शिवसेना जिल्हा समन्वयक प्रा.शिवाजीराव सांवत सर* यांनी तालुक्यातील *प्रत्येक विकास कामाला एकत्र मिळून पाठपुरावा करून तालुक्याचा विकास करू* अशी साद दिली.
यावेळी *शिवसेना जिल्हाप्रमुख धर्मवीर धनंजय डीकोळे साहेब. दादासाहेब साठे, संजय कोकाटे, जिल्हापरिषद सदस्य भारत आबा शिंदे, शंभूराजे मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, शिवाजी राजे कांबळे, (मा.सभापती समाजकल्याण) राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रमेश पाटील, सौदागर जाधव ( काँग्रेस तालुकाध्यक्ष) सचीन बागल युवासेना जिल्हा प्रमुख*
*योगेश पाटील भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष, सरपंच प्रवीण पाटील, उपसरपंच भारत देशमुख, दत्तात्रय फरड, सचिन पाटील, शिवसेना शाखाप्रमुख भास्कर देशमुख. युवासेना उप तालुकाप्रमुख जयदेव पवार, इंडियन ह्युम पाईप चे मुजावर साहेब, धरण व्यवस्थापन चे कार्यकारी अभियंता मोरे साहेब, गौरव देवकर उपविभागीय अभियंता व शेतकरी उत्तम मगर, तानाजी नागटिळक, अण्णासाहेब मुटकुळे, जरीचंद देशमुख, सुकुमार देशमुख, पडसाळी सोलनकरवाडी येथील नागरिक उपस्थित होते*


No comments:
Post a Comment